कोल्हापुरात पोलिसांना राखी; भागीरथी महिला संस्थेचा रक्षाबंधन उपक्रम

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

जनसेवेसाठी २४ तास कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेकदा सण-समारंभापासून दूर राहावे लागते. पोलिसांच्या या सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीने कोल्हापुरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये रक्षाबंधनाचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या महिला भगिनींनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले.


भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून सौ. अरुंधती महाडिक यांच्या पुढाकाराने महिला सबलीकरणासह विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलिसांसाठी रक्षाबंधनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.

पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन पोलीस दल जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असते. सणासुदीच्या काळातही कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भागीरथी संस्थेच्या महिला सदस्यांनी राखी बांधली. यावेळी पोलिसांकडूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

महिला भगिनींचे रक्षण करण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर राहावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

विविध पोलीस ठाण्यांमध्ये रक्षाबंधन

शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या सदस्यांनी राखी बांधली. यावेळी रंजना शिर्के, अर्चना मोटे, पूजा संन्नके, रूपाली कुंभार, दीपा पाटील, राजेश्वरी मोटे, शारदा पोटे आणि सुप्रिया चौगुले उपस्थित होत्या.

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यात आली. यावेळी शिवानी पाटील, जीविज्ञा क्षीरसागर, गायत्री फाले, राधिका पाटील आणि शरयू भोसले उपस्थित होत्या.

जुना राजवाडा पोलीस ठाण्यात निरीक्षक किरण लोंढे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यात आली. यावेळी ऐश्वर्या देसाई, राधा मेस्त्री, कल्याणी पवार मेढे, सपना मेथे, अनिता सावंत, अश्विनी मिठारी, सायली सावंत, नम्रता सुतार, नक्षत्र सणगरे आणि दिपाली बेलवलकर उपस्थित होत्या.

राजारामपुरी पोलीस ठाण्यात निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक रुपेश इंगळे, मनोज कदम यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून औक्षण करण्यात आले. यावेळी छाया ननवरे, सीमा पालकर, चंद्रकला सिदनेर्ली, शुभांगी सूर्यवंशी, दीपिका राकुडे, शीतल ढेरे, गीता करंडे, उर्मिला मराठे आणि रिया सूर्यवंशी उपस्थित होत्या.

गांधीनगर पोलीस ठाण्यातही रक्षाबंधनाचा उपक्रम पार पडला. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सुलोचना नार्वेकर यांच्यासह अश्विनी जाधव, मीना गुरव, कोमल सुतार, उमा खांडेकर, अश्विनी पवार, सुनिता अनावर, सविता सुतार, पूजा कांबळे, विद्या पाटोळे आणि जयश्री तळसदे उपस्थित होत्या.

करवीर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या सदस्यांनी राखी बांधली. यावेळी रोहिणी वाडकर, प्रियंका वाडकर, रंजना येडगे, सुजल निरगळ, सुनिता कोळी आणि आरती सांगवडेकर उपस्थित होत्या.

या उपक्रमातून पोलीस दल आणि समाजातील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ झाले. जनतेच्या सुरक्षेसाठी वर्षभर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम ठरला.

Post a Comment

0 Comments