आदमापूरमधील शपथेला अंनिसचा विरोध; बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलन

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून ठरावधारकांना कर्नाटकातील सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या मंदिरात शपथ दिल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही शपथविधीच्या प्रकारावर प्रश्न उपस्थित करत ठरावधारकांवरील अविश्वासाबाबत टीका केली होती.


आदमापूरमध्ये अंनिसचे आंदोलन

सौंदत्ती येथे शपथविधी झाल्यानंतर आता आदमापूर येथे पुन्हा शपथ घेण्यात येणार असल्याने हा विषय चर्चेत आला आहे. निवडणुकीसारख्या लोकशाही प्रक्रियेत शपथ घेण्याच्या प्रकाराला विरोध करत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंदोलन करणार आहे.

मतदानाच्या दिवशी राजकीय वातावरण तापले

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होत असताना शपथविधीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. आदमापूर येथील आंदोलनाकडे राजकीय वर्तुळासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शपथविधी आणि त्याविरोधातील आंदोलनामुळे मतदानाच्या दिवशी हा मुद्दा चर्चेचा ठरण्याची शक्यता आहे.


Post a Comment

0 Comments