कोल्हापुरात ‘स्पंदन’ चित्रकला स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 महात्मा गांधी जयंतीनिमित्त कोल्हापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी आणि बोधिसंगम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘स्पंदन चित्रकला स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. दाभोळकर कॉर्नर येथील कोल्हापूर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात झालेल्या या स्पर्धेत ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


महात्मा गांधींचे विचार, सत्य, अहिंसा, स्वच्छता, शांतता आणि सामाजिक सलोखा या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून चित्रे साकारली. ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी अशा दोन गटांत घेण्यात आली.

५ वी ते ७ वी गटात कृष्णा मोरे यांनी प्रथम, गौरविती पांचाळ यांनी द्वितीय, तर अनुष्का शिंदे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या गटात आध्या रुपेनिकर, तन्मय सुतार, मनिष प्रजापत, आध्या सूर्यवंशी, राजनंदिनी कोडसे, अनुष्का महालो आणि रिदान आदित्य यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.



८ वी ते १० वी गटात अमेय पवार प्रथम, अभय मोहिते द्वितीय, तर वीरा प्रसाद निवळकर तृतीय क्रमांकावर राहिले. पालस्मी जगताप, युवराज नाईक, मानस पाटील, समृद्धी काणे, खुशी कोडले, मुत्तप्पा हडपद आणि पृथ्वीराज कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

या विजेत्यांना आमदार जयंत आसगावकर आणि शहराध्यक्ष प्रवीण लक्ष्मणराव केसरकर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. मुलांनी आपल्या कल्पना रंगांच्या माध्यमातून व्यक्त करणे ही सुंदर गोष्ट असून, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते, असे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमाला नगरसेविका दिपाली घाटगे, स्वाती कांबळे, सुषमा जरग, जयश्री कांबळे, भरत रसाळे, उदय पवार, संजय पटकारे, राजदीप भोसले, सरलाताई पाटील, भारती पोवार, वेदवती मोहिते, संजय पोवार-वाईकर, विजयानंद पोळ, संदीप बिरांजे, उदय फाळके, रोहित पाटील, ओंकार मगदूम, गौरव कांबळे, स्नेहा पाटील बुद्धीहाळकर, सोनल देशपांडे आणि जयवंत वळकुंजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे निरीक्षक म्हणून सोनल देशपांडे, संजय कुंभार, ओंकार शेळके आणि ओंकार वाघवेकर यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या आयोजनासाठी रेश्मा खाडे, यश आबोळे, हुसेन मोमीन, रेश्मा चांदणे, राजाराम शिंदे, रत्नाकर माळी, दीपक पाटील, शिवराज जाधव, उमर मुजावर आणि विशाल कासगुडे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments