वाय. पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाची दमदार कामगिरी; ३२ कंपन्यांकडून ८९ प्लेसमेंट ऑफर्स

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या डेटा सायन्स विभागातील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विभागातील विद्यार्थ्यांना ३२ हून अधिक नामांकित कंपन्यांकडून तब्बल ८९ प्लेसमेंट ऑफर्स मिळाल्या असून, एचपी (Hewlett-Packard) कंपनीत ८.५ लाख रुपयांचे सर्वोच्च पॅकेज मिळाले आहे.


यावर्षी एचपी, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), टेक महिंद्रा, कॉन्सेन्ट्रिक्स, फोक्सवॅगन इंडिया, ग्लो लॉजिक्स सोल्युशन्स, टेस्टयंत्रा सॉफ्टवेअर सोल्युशन्स, अॅपमोसिस टेक्नॉलॉजीज आणि वॉलस्टार टेक्नॉलॉजीज यांसह अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विद्यार्थ्यांची निवड केली.

लॉन्चड ग्लोबल या कंपनीने सर्वाधिक २५ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यानंतर अनलॉक्सने १४, वॉलस्टार टेक्नॉलॉजीजने ८ आणि ग्लो लॉजिक्स प्रा. लि.ने ४ विद्यार्थ्यांची निवड केली. याशिवाय एज्यु व्हर्सिटी, टेस्टयंत्रा, टेक महिंद्रा, TCS, इन्फोसिस आदी कंपन्यांनीही विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार Technical Training, Coding Practice, Communication Skills, Soft Skills, Mock Interviews, Group Discussions आणि Career Counselling यांसह प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण दिले जाते. उद्योग–महाविद्यालय सहकार्य, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्लेसमेंट उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होत असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले.

दरम्यान, महाविद्यालयाला नुकतेच Washington Accordच्या निकषांनुसार National Board of Accreditation (NBA) मानांकन मिळाले आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला आहे. या दोन्ही मान्यतांमुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी मिळाल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.

या यशासाठी अधिष्ठाता (CDCR) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, विभागप्रमुख डॉ. गणेश व्ही. पाटील, प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, CHRO श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments