कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी अल्ट्राव्हाइलेट (Ultraviolette) ने महाराष्ट्रातील विस्ताराला गती देत कोल्हापूरमध्ये अत्याधुनिक 'युव्ही स्पेस स्टेशन' सुरू केले आहे. या नव्या एक्सपिरियन्स सेंटरमुळे शहरातील ग्राहकांना कंपनीच्या X-47 क्रॉसओव्हर आणि F77s या उच्च-कार्यक्षमता असलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलींचा अनुभव घेता येणार असून, विक्री व सर्व्हिसच्या सुविधाही उपलब्ध होणार आहेत.
कंपनीने एम/एस. आहुजा मोबिलिटी प्रा. लि. यांच्या भागीदारीत सुरू केलेले हे 3S (Sales, Service आणि Spares) सुविधा केंद्र आहे. येथे ग्राहकांना टेस्ट राइड, सर्व्हिस, अस्सल स्पेअर पार्ट्स, मर्चेंडाइज आणि ॲक्सेसरीज एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.
अल्ट्राव्हाइलेटच्या या मोटरसायकलींमध्ये ४०.२ हॉर्सपॉवरची क्षमता, १०० न्यूटन मीटर टॉर्क, अवघ्या २.८ सेकंदांत ० ते ६० किमी प्रतितास वेग अशी दमदार कामगिरी आहे. तसेच १०.३ kWh क्षमतेची बॅटरी एका चार्जमध्ये ३२३ किलोमीटरपर्यंत (IDC) रेंज देते.दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने 'किल द पेट्रोल बिल' ही विशेष योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत नवीन F77 किंवा X-47 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या जुन्या दुचाकीच्या वापरानुसार ₹३० हजारांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.
यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व सह-संस्थापक नारायण सुब्रह्मण्यम म्हणाले, "कोल्हापूरची अभियांत्रिकी परंपरा आणि ऑटोमोबाईल संस्कृती अल्ट्राव्हाइलेटच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे. या नव्या स्पेस स्टेशनच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रिक मोटरसायकलींचा अनुभव देण्यास आम्ही उत्सुक आहोत."
या नव्या दालनामुळे अल्ट्राव्हाइलेटचे देशभरातील नेटवर्क आता ३५ शहरांपर्यंत विस्तारले असून, महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत कंपनीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

0 Comments