कोल्हापुरात 'कलापुरी'चे कलादालन; ग्रामीण महिला कारागिरांना नवे व्यासपीठ

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

ग्रामीण महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. लक्ष्मीपुरी येथे 'कलापुरी'च्या कलादालनाचे उद्घाटन २ ऑगस्ट रोजी होणार असून, या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या कलाकृती आता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहेत.


सौ. अपर्णा चव्हाण आणि श्री. आतिष चव्हाण यांनी सुरू केलेल्या 'कलापुरी' या स्टार्टअपने गेल्या दहा वर्षांत ५०० हून अधिक ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कोल्हापुरी चप्पल, पारंपरिक कोल्हापुरी दागिने आणि हँडमेड बास्केट यांसारख्या हस्तनिर्मित वस्तूंना देशासह परदेशातही बाजारपेठ मिळवून देण्यात या उपक्रमाने यश मिळवले आहे.

लक्ष्मीपुरीतील नव्या कलादालनात जीआय मान्यताप्राप्त कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी साज, ठुशी, बोरमाळ तसेच विविध हस्तनिर्मित बास्केट विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. ग्रामीण महिला कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृती आता करवीरवासीयांना एकाच छताखाली पाहता आणि खरेदी करता येणार आहेत.


पत्रकार परिषदेत श्रीधर वैद्य आणि सौ. अपर्णा चव्हाण यांनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी संस्थापक श्री. आतिष चव्हाण आणि अमृता काळे उपस्थित होत्या.महाराष्ट्र शासनाने हस्तकला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी कलापुरीचा गौरव केला असून, मोरेवाडी, यळगुड आणि सोनी येथील उत्पादन केंद्रांमधून शेकडो महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

कलादालनाच्या उद्घाटनानिमित्त प्रत्येक खरेदीवर आकर्षक सवलत आणि विशेष भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.ग्रामीण महिला कारागिरांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कोल्हापूरच्या पारंपरिक हस्तकलेचा वारसा जपण्यासाठी नागरिकांनी या कलादालनाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थापिका सौ. अपर्णा चव्हाण यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments