कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
येथील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या प्राथमिक विभागातील इयत्ता पहिली ते दुसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे ३० ते ४० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
हा उपक्रम प्रभागातील नगरसेवक अमर समर्थ यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमादरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ए. आमकरणे यांचा शाल, श्रीफळ व रोप देऊन सत्कार करण्यात आला.प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सीरसागर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पर्यवेक्षक जे. बी. देखकर, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आर. व्ही. जाधव यांनी केले, तर एस. एम. वाणी यांनी आभार मानले.

0 Comments