डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या डॉ. प्रमोद पाटील यांना 'सीआरएस लीडरशिप अवॉर्ड'

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. प्रमोद एस. पाटील यांना उत्कृष्ट संशोधन आणि शैक्षणिक कार्याची दखल घेत 'सीआरएस लीडरशिप अवॉर्ड' प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.


 

चिरंतन रसायन संस्था (सीआरएस) आणि सौराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'सायन्स बियॉन्ड बाउंडरी : इन्व्हेन्शन, डिस्कव्हरी, इनोव्हेशन अँड सोसायटी (रसायन-२३)' या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांचा 'डिस्टिंग्विश्ड स्पीकर' म्हणूनही गौरव करण्यात आला.

या परिषदेत भारतासह विविध देशांतील संशोधक, प्राध्यापक, वैज्ञानिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. रासायनिक विज्ञानातील संशोधन, नवोपक्रम आणि त्याचा समाजाशी असलेला संबंध या विषयांवर परिषदेत सखोल चर्चा झाली. डॉ. प्रमोद पाटील यांनी रासायनिक विज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि नवोपक्रम या विषयावर व्याख्यान दिले.

असाधारण शैक्षणिक कामगिरी, प्रशासकीय नेतृत्व, संशोधनाला दिलेली चालना आणि रासायनिक विज्ञानातील नवकल्पनांचा स्वीकार यासाठी डॉ. पाटील यांना सीआरएस लीडरशिप अवॉर्ड, सुवर्णपदक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आ. सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी डॉ. प्रमोद पाटील यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments