कोल्हापूर | नवप्रवाह मराठी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर "सेवा, सुशासन व गरीब कल्याण" अभियानांतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याच अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने १९ जुलै रोजी भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, युवा वर्ग तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
"रक्तदान हे श्रेष्ठदान" या भावनेतून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी सर्व नागरिकांनी या समाजोपयोगी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0 Comments