कोल्हापूर  : नवप्रवाह मराठी 

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्थेच्या वतीने अभियांत्रिकीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी (कॅप) ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मार्गदर्शनपर सेमिनाराचे आयोजन मंगळवार, दि. २८ जुलै रोजी करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजता होणाऱ्या या सेमिनारमध्ये ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.



या सेमिनारमध्ये प्रवेश प्रक्रियेतील फेऱ्यांमध्ये झालेला बदल, ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वीची तयारी, फॉर्म भरताना होणाऱ्या सर्वसाधारण चुका, कट-ऑफचे विश्लेषण, गुणवत्तेनुसार योग्य शाखा व महाविद्यालयाची निवड, अलॉटमेंटची प्रक्रिया व नियम, नवीन शुल्क पद्धती तसेच प्रवेश निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत ऑप्शन फॉर्म अचूकपणे भरणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून, कोणत्याही प्रकारच्या चुका टाळण्यासाठी हे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यावेळी उपस्थितांच्या शंकांचेही निरसन करण्यात येणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. अभियंता बनण्याचा मार्ग अधिक सुकर करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शनपर सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे तसेच ॲडमिशन हेड प्रा. आर. जी. बेन्नी यांनी केले आहे.