12 वी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेमिनारमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

12 वी विज्ञान (PCB) उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय क्षेत्रासह हेल्थकेअर, अलाईड हेल्थ सायन्सेस, फार्मसी, फिजिओथेरपी, नर्सिंग, हॉस्पिटॅलिटी, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी केले. कदमवाडी येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित "12 वी PCB नंतरच्या करिअर संधी" या मार्गदर्शन सेमिनारमध्ये ते बोलत होते.



या सेमिनारमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रमुख मार्गदर्शक डॉ. अजित पाटील यांनी 12 वी PCB नंतर उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रम, देश-विदेशातील उच्च शिक्षण, रोजगाराच्या संधी तसेच बदलत्या काळातील नव्या करिअर पर्यायांची सविस्तर माहिती दिली.

डॉ. शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊन योग्य करिअरची निवड करावी, असे आवाहन केले. तसेच डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाच्या संधी आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.

सेमिनारमध्ये फार्मसी, फिजिओथेरपी, नर्सिंग, हॉस्पिटॅलिटी, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमानंतर विद्यार्थी व पालकांनी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, सिम्युलेशन लॅब आणि विविध विभागांना भेट देत प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या संधींबाबत तज्ज्ञांशी संवाद साधला.

Post a Comment

0 Comments