कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित मेगा पूल कॅम्पस ड्राइव्ह–२०२६ उत्साहात पार पडला. फार्मसी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि शैक्षणिक संस्था व औषधनिर्माण उद्योग यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या उपक्रमातून महाविद्यालयाच्या १६ विद्यार्थ्यांची नामांकित औषधनिर्माण कंपन्यांमध्ये निवड झाली.



या कॅम्पस ड्राइव्हसाठी विविध फार्मसी महाविद्यालयांतील ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखतींमध्ये सहभाग घेतला. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची एमबी केमिकल्स, ग्रुप फार्मास्युटिकल्स, ग्लेनमार्क, फायझर आणि झायडस फार्मा या आघाडीच्या कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग तसेच सेल्स अँड मार्केटिंग विभागासाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गोवा व पुणे येथील प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

भरती प्रक्रियेत एमबी केमिकल्स, ग्रुप फार्मास्युटिकल्स, ग्लेनमार्क, इंडोको, फायझर, सेंचॉर, एफडीसी, झायडस फार्मा आणि यशस्वी ग्रुपसह अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची, आपले तांत्रिक ज्ञान आणि संवादकौशल्ये सादर करण्याची तसेच उज्ज्वल करिअरच्या संधींचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी या उपक्रमातून मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी कौलगे आणि डॉ. सोनाली दिवटे यांनी केले. डॉ. अभिनंदन पाटील यांनी आभार मानले, तर प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागप्रमुख आशुतोष पी. कांबळे यांनी संपूर्ण नियोजन व समन्वयाची जबाबदारी सांभाळली. विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले आणि प्राचार्य डॉ. सी. एम. जंगमे यांचे मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले.