कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
ताराबाई पार्क परिसरातील सामाईक जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर Compound Wall बांधकाम प्रकरणी अखेर कोल्हापूर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी उदय शिंदे यांना Show Cause Notice बजावण्यात आली असून १५ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नगरसेविका दिपाली राजेश घाटगे यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी Complaint दाखल करून तातडीने कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सामाईक मिळकतीच्या जागेत कोणतीही आवश्यक Permission न घेता बांधकाम सुरू करण्यात आले होते.
तसेच नगररचना विभागाकडून अधिकृत मंजुरी नसतानाही काही अधिकारी आणि अभियंत्यांच्या संगनमताने हे काम सुरू असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सिद्धार्थ शिंदे आणि त्यांचे वडील उदय शिंदे यांच्यावर संबंधित अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इतर जागामालकांची संमती न घेताच हे बांधकाम करण्यात आल्याचा मुद्दाही तक्रारीत उपस्थित करण्यात आला होता. भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी जागेची संयुक्त पाहणी करून तात्काळ Legal Action करावी, अशी मागणी दिपाली घाटगे यांनी केली होती.
दरम्यान, महापालिकेने उदय शिंदे यांना बजावलेल्या नोटिशीत १५ दिवसांच्या आत आवश्यक Documents सादर करण्यास सांगितले आहे. तसेच २४ जून २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता नगररचना विभागात होणाऱ्या Hearing ला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिकेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, निर्धारित मुदतीत समाधानकारक खुलासा न केल्यास संबंधित बांधकामावर Demolition सह पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.
ताराबाई पार्कमधील या प्रकरणामुळे शहरात चर्चांना उधाण आले असून आता २४ जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments