ही आमची राजकीय लढाई, राजकारणामध्ये अडथळे येणारच... : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

 उपद्रवी रवि इंगवले हा स्वत:ला खूप शहाणा समजतो. पण, आहे ब्लॅकमेलर.. माझा कॅसिनो मधील व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी पैशाची मागणी करण्यासाठी एका व्यक्तीला रवि इंगवले याने आमच्याकडे पाठविले होते. पण आम्ही त्याला भिक घातली नाही. अशा पद्धतीने कोल्हापूरातील अनेकांना ब्लॅकमेलिंग करण्याचे, गंडा घालण्याचे काम रवि इंगवले याने केले आहे व करत आहे. त्याने आज सोशल मिडीयाला प्रसारित केलेल्या व्हिडीओ क्लिप सोबत जी ऑडीओ क्लिप प्रसिद्ध केली असून, यामध्ये वापरण्यात आलेल्या अपशब्दांद्वारे आमची नाहक बदनामी केली आहे. त्याचेवर आम्ही कायदेतज्ञांचा सल्ला घेत असून, हा एडीट केलेला व्हिडीओ त्यांनी प्रसारित केला असून, यातून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. याविरुद्ध र.रु.५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करत आहोत. असा खुलासा नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी केला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कथित वायरल व्हिडिओ प्रकरणावर त्यांनी प्रसिद्धी पत्रकार प्रतिक्रिया दिली आहे.



या व्हिडिओ बद्दल प्रसिद्धी पत्रकात त्यांनी सांगितलं..

"वास्तविक पाहता हा व्हिडीओ प्रसारित करण्यात मुळात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचाच हात आहे. व्हिडीओ हा विधानपरिषदेचे कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध करून याची मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांचेकडे चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांचा यामध्ये कोणताही संबंध नसल्याचे सिद्ध झाले नाही काय? याचा खुलासा करणे गरजेचे होता. ज्याने हा व्हिडीओ केला त्यानेही आपली भूमिका मांडली. जरी आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीत मतदानाच्या तोंडावर हा व्हिडीओ व्हायरल केला असला तरी त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीत शहरातील सुज्ञ मतदारांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवून महायुतीला सत्तेत आणले. याबद्दल जनतेचे मनपूर्वक जाहीर आभार..!! पण सद्या सत्तेअभावी आमदार सतेज पाटील यांचा जळफळात होत असल्यानेच “एडा बनून पेढा खाण्यात” ते मग्न आहेत. 

वास्तविक ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ बनविला होता त्या व्यक्तीने त्याचे लेखी म्हणणे व स्वत:चा व्हिडीओ तयार करून आमदार राजेश क्षीरसागर यांचा यामध्ये कसलाही संबध नसल्याचे जाहीर केले असून, लवकरच यासंदर्भात आम्ही हे सर्वपुरावे घेवून मिडीयाच्या माध्यमातून जनतेसाठी प्रसारित करत आहोत. रवि इंगवले हा लायकी शून्य असलेला गुंड असून, मी काही बोलण्यापेक्षा कोल्हापूर शहरातील जनता सुज्ञ असून जनतेने त्याला त्याची लायकी दाखवून दिली आहे.

रवि इंगवले कितीही भूकला तरीही कोल्हापूर शहरातील जनतेसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांचे विकासात्मक, आंदोलनात्मक, सामाजिक, आरोग्य विषयक, क्रीडा, कला क्षेत्रातील जे योगदान आहे त्यामुळे जनतेचा आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर असलेला विश्वास कधीही कमी होणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. आजपर्यंत आम्ही जनतेत शून्य किंमत असलेल्या रवि इंगवलेला कोणतीही भिक घातली नसून, पुढच्या काळात कुठलीही भिक न घालता याचा खरा चेहरा जनतेसमोर आणू.

आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे विधिमंडळ अधिवेशन कामी मुंबई मध्ये असून या प्रकरणासंदर्भात उद्या दि.२८.०६.२०२६ रोजी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका जाहीर करतील.

Post a Comment

0 Comments