डॉ. संजय डी. पाटील यांना ‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड 2026’ शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानाचा गौरव

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड 2026’ सोहळ्यात डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवून सामाजिक परिवर्तन घडवून आणल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. पुण्यातील Hyatt Regency Pune येथे नवभारत-नवराष्ट्रतर्फे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. परवेझ ग्रांट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डी. वाय. पाटील ग्रुपच्या नेतृत्वाखाली ५० हून अधिक शैक्षणिक संस्थांमधून ४७ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणासोबतच कृषी विज्ञान केंद्र आणि विविध कृषी प्रयोगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्यही डॉ. संजय पाटील सातत्याने करत आहेत.

डॉ. संजय डी. पाटील यांनी सांगितले की, “हा सन्मान शिक्षण, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे केलेल्या कार्याचा गौरव आहे. समाजासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारातून मिळाली आहे.”


Post a Comment

0 Comments