कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
Kolhapur Congress मध्ये मोठा organizational change करण्यात आला असून काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नगरसेवक प्रवीण केसरकर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, शहर काँग्रेसमध्ये leadership change करत विद्यमान शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या जागी ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड करण्यात आली. Mahapalika election मध्ये काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
या निवडीपूर्वी काँग्रेसकडून जिल्हा व शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी observers नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या अहवालानुसारच या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.या प्रक्रियेसाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

0 Comments