NEET Paper Leak प्रकरण: कोल्हापुरातील Coaching Classes वर Action ची मागणी; शाहू सेनेचा आक्रमक इशारा

 कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

कोल्हापूरमध्ये NEET Paper Leak प्रकरणाचे पडसाद उमटू लागले असून, संबंधित Coaching Classes आणि Colleges वर strict action घेण्याची मागणी शाहू सेनेने केली आहे. देशभरात चर्चेत असलेल्या या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूर, नांदेड आणि पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात अनेक आरोपींना अटक केली असून, काही Coaching Class चालकांची नावेही समोर आली आहेत.


शाहू सेनेचे संस्थापक अध्यक्ष शुभम शिरहट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, जिल्ह्यातील संशयित Coaching Academies आणि त्यांच्याशी tie-up केलेल्या Colleges ची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की, कोल्हापुरातील अनेक private coaching classes महाविद्यालयांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची fee वसूल करत आहेत. शासनाकडून grant मिळणाऱ्या Colleges मध्ये 75% attendance rule डावलून नियमांचे उल्लंघन होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना admission मिळणे कठीण होत असल्याचे शाहू सेनेने म्हटले आहे.

शाहू सेनेने प्रशासनाला इशारा देत स्पष्ट केले की, जर संबंधित coaching mafia आणि colleges वर तातडीने action घेतले नाही, तर जिल्ह्यातील अशा सर्व Coaching Classes ला टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल.

यावेळी उपाध्यक्ष चंदा बेलेकर यांच्यासह रोनक पोवार, करण कवठेकर, अभिजित शिंदे, तन्मय हिंदूळे, विवेक पोर्लेकर, अजय शिंगे, अन्सर मगेरी, पांडुरंग पंगम, रंजित पाटील, विराज पाटील, सुमित पोवार, प्रतिक पाटील, अनिकेत कोंडुस्कर आणि जीवन राटे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments