कोल्हापुरात गरजू महिलांना पिंक रिक्षांचे वाटप; महिला सक्षमीकरणासाठी रोटरीचा पुढाकार

 कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 Rotary Club of Kolhapur Heritage आणि RCKOP Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंक रिक्षांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.यल्लमा मंदिर चौकाजवळील आयटी पार्क रोड परिसरातील “श्वास वाटिका” येथे आयोजित कार्यक्रमात महापौर Rupa Rani Nikam यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना रिक्षांच्या चाव्या देण्यात आल्या. विशेष म्हणजे महापौरांनी स्वतः पिंक रिक्षा चालवत उपक्रमाला प्रोत्साहन दिले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी Arun Bhandare होते. त्यांनी रोटरी क्लबच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करत “हेरिटेज क्लबने समाजसेवेचा डोंगर उभा केला आहे,” असे सांगितले.

महापौर रुपाराणी निकम यांनी महिलांसाठी शासनाच्या Pink Rickshaw Policy चा पाठपुरावा करून अधिकाधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.

या उपक्रमाचे Project Chairman Prashant Kulkarni यांनी भविष्यात आणखी महिलांना पिंक रिक्षांचे वाटप करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी रोटरी क्लब कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाला रोटरी हेरिटेजच्या प्रेसिडेंट Pooja Gandhi, सेक्रेटरी Shruti Mantri, कोषाध्यक्ष Prashant Mehta तसेच देणगीदार Bharat Jadhav यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

यावेळी “श्वास वाटिका” येथे वृक्षारोपण कार्यक्रमही पार पडला. महापौरांनी उद्यानाची पाहणी करून रोटरीच्या पर्यावरणपूरक कामाचे कौतुक केले आणि आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमात लाभार्थी महिला स्मिता मगदूम आणि प्रभावती राशिवडे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रोटेरियन बिपिन जाजू यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रेसिडेंट पूजा गांधी यांनी केले.

Post a Comment

0 Comments