कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
D.Y.Patil Deemed University आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा 2025-26 मध्ये दमदार 109 गुणांची कमाई करत D. Y. Patil Physiotherapy College संघाने सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.विजेत्या संघांना Prithviraj Sanjay Patil आणि कुलगुरू Dr. Rakesh Kumar Sharma यांच्या हस्ते चषक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत फिजिओथेरपी कॉलेजची श्रावणी अशोक जंगटे आणि School of Engineering & Management चा सोहम राजेश शिंदे यांना ‘Outstanding Player Award’ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, “क्रीडा स्पर्धा म्हणजे केवळ जय-पराजय नव्हे, तर नेतृत्व, शिस्त आणि Team Spirit शिकवणारे प्रभावी व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी खेळातून आत्मविश्वास, फिटनेस आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करावा.”
कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या आठ संस्थांमधील तब्बल 870 खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक अशा 10 विविध क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला. शिक्षणासोबतच Sports, NSS, NCC आणि सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे ठरतात.
या स्पर्धेदरम्यान विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि संघांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जगमे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. ए. एम. गुरव, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. ग्रंथेज ओतारी, डॉ. मनीषा विजापूरकर, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, सुशांत कायपुरे यांच्यासह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व क्रीडा विभागप्रमुख उपस्थित होते.
विद्यापीठाचे कुलपती Dr. Sanjay D. Patil, संस्थेचे उपाध्यक्ष Satej Patil आणि विश्वस्त Ruturaj Patil यांनी विजेत्या संघांसह सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.

0 Comments