दिल्ली दौऱ्यावर Krushnaraj Mahadik; Nitin Nabin आणि Tejasvi Surya यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली : नवप्रवाह मराठी 

 महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष Krushnaraj Mahadik यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष Nitin Nabin तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष Tejasvi Surya यांची भेट घेतली. या भेटीत पक्ष संघटन, युवकांचे प्रश्न आणि युवा मोर्चाच्या भविष्यातील वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कृष्णराज महाडिक यांनी लगेचच संघटनात्मक कामकाजाला सुरुवात केली असून गेल्या काही दिवसांपासून ते नवी दिल्लीत विविध वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांच्याशी संवाद साधला.

या चर्चेदरम्यान युवकांच्या अपेक्षा, पक्ष संघटन मजबूत करण्याचे नियोजन, तसेच युवा मोर्चाचा विस्तार कसा करायचा याबाबत मार्गदर्शन घेण्यात आले. यासोबतच अधिकाधिक युवकांना भाजपशी जोडण्यासाठी membership drive, तसेच युवकांसाठी employment fairs (रोजगार मेळावे) आयोजित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

युवा पिढीपर्यंत भाजपची विचारधारा पोहोचवण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याबाबतही या बैठकीत विचारविनिमय झाला. दरम्यान, कृष्णराज महाडिक यांच्या निवडीबद्दल आणि त्यांच्या आगामी कामकाजासाठी नितीन नबीन व तेजस्वी सुर्या यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments