गडहिंग्लज : नवप्रवाह मराठी
राज्य उत्पादन शुल्क (State Excise) विभागाच्या गडहिंग्लज कार्यालयाकडून १३ मार्च २०२६ रोजी अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या raid मध्ये गोवा बनावटी मद्य, हातभट्टी दारू तसेच तीन वाहनांसह एकूण ७ लाख ३३ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल seize करण्यात आला.या प्रकरणी सागर चंद्रकांत भुसुरी (रा. भडगाव, ता. गडहिंग्लज), अमृत चंद्रकांत भोसले (रा. हासूर बु., ता. कागल), प्रकाश लक्ष्मण नाईक (रा. हिंडगाव, ता. चंदगड), सर्जेराव विलास जिरगे (रा. गलगले, ता. कागल) आणि शंकर विठू पाटील (रा. अर्जुनी, ता. कागल) यांच्यावर गुन्हे register करण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त (Enforcement & Vigilance) प्रसाद सुर्वे तसेच कोल्हापूर विभागाचे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज पथकाने ही special drive राबवली.भडगाव, वडरगे (ता. गडहिंग्लज), अर्जुनी (ता. कागल) आणि हिंडगाव (ता. चंदगड) येथे नोंदविण्यात आलेल्या पाच वेगवेगळ्या cases मध्ये गोवा दारू वाहतूक करणारी एक four wheeler car, एक two wheeler तसेच हातभट्टी दारू वाहतूक करणारी एक दुचाकी जप्त करण्यात आली.
कारवाईदरम्यान गोवा बनावटी मद्यसाठा ₹3,61,010, हातभट्टी दारू ₹7,050 तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरलेली वाहने ₹3,65,000 किंमतीची जप्त करण्यात आली असून एकूण मुद्देमाल ₹7,33,060 इतका आहे.या operation मध्ये निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, स्वप्नील पाटील, रोहित केरीपाळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान संदीप जानकर, संदीप चौगुले, भरत सावंत, महिला जवान स्वप्नाली बेडगे तसेच वाहनचालक अविनाश परीट यांनी सहभाग घेतला.


0 Comments