कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
पेट्रोल, डिझेल तसेच गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांविरोधात करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उंचगाव हायवे पुलाखाली कोल्हापूर-हुपरी मार्गावर Road Roko आंदोलन करण्यात आले. वाढती Inflation आणि Fuel Price Hike विरोधात शिवसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान दुचाकी वाहने आणि गॅस सिलेंडरला प्रतीकात्मक हार घालून वाढत्या महागाईकडे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ Traffic विस्कळीत झाला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
यावेळी बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याचा आरोप केला. इंधन दरवाढीमुळे Transport खर्च वाढून जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे Budget कोलमडल्याची टीका त्यांनी केली.
केंद्र सरकारने तातडीने इंधन दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट आणि शहरप्रमुख विशाल देवकुळे यांनीही वाढत्या महागाईबाबत केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
या आंदोलनात करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, शहरप्रमुख विशाल देवकुळे, कामगार सेना राजू सांगावकर, उपतालुकाप्रमुख राहुल गिरूले, फेरीवाले संघटना बाळासाहेब नलवडे, दीपक गौड, युवा सेना योगेश लोहार, सचिन नागटिळक, महादेव खोचगे, शंकर खोत, शिवाजी लोहार, शांताराम पाटील, मनोज कुरळे, दत्ता फराकटे, जितू कुबडे, आनंदा मेंगाने, कृष्णात तुरुके, दीपक धिंग, सुनील पारपाणी, दीपक अंकल, आनंदा नाईक, शरद माळी, कैलास जाधव, अक्षय ठमके, नमेश चव्हाण, वसंत पोवार, सागर यादव, बाबुराव पाटील, गणेश सूर्यवंशी, धनंजय पाटील, संदीप वडर, प्रवीण गोरे, अनिल जाधव, शंकर कांबळे, राजू व्हनाल, किशोर कामरा, जितू चावला, संदीप तिकोडे, सुरज पाटील, किरण सिंग, सिकंदर मुजावर, राजू राठोड, गणेश पाटील, मोहन राजपूत, शरद चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments