कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
जिल्ह्यातील हजारो वृद्ध पेन्शनधारकांना गेल्या २ ते ३ महिन्यांपासून संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेची pension मिळालेली नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना औषधोपचार आणि दैनंदिन खर्चासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.याच पार्श्वभूमीवर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटलं की, “शासनाकडे पैसे नसतील तर तसे जाहीर करावे, पण गरीब आणि वृद्धांच्या हक्काची pension रोखू नये.”तर करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी “हयातीच्या दाखल्यासाठी वृद्धांना उन्हात फिरवण्याऐवजी तलाठ्यांनी घरपोच survey करून verification करावे,” अशी मागणी केली.
सध्या DBT linking प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थ्यांची ७ ते ८ महिन्यांची थकीत pension अडकून पडली असल्याचाही मुद्दा यावेळी मांडण्यात आला.तहसीलदार स्वप्निल पवार यांनी प्रशासनाच्या स्तरावर निर्णय घेतला जाईल तसेच थकीत यादी शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली.
करवीर तालुका शिवसेनेच्या या आंदोलनामुळे आता शासन वृद्धांच्या pension प्रश्नावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर,उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, सुनील पारपाणी, दिपक अंकल, कैलास जाधव, बाबुराव पाटील, रामराव पाटील,गणेश चावरे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments