कोल्हापूर | नवप्रवाह मराठी
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये Action आणि Thriller Genre ला नवा आयाम देणारा ‘Mission’ हा बहुप्रतिक्षित सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला हा चित्रपट येत्या 15 May 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या काल्पनिक कथेत एक धक्कादायक प्रश्न उपस्थित केला जातो 300 किलो RDX पैकी 100 किलो वापरलं गेलं, पण उर्वरित 200 किलो RDX गेलं कुठे?याच रहस्याचा थरारक शोध म्हणजे ‘Mission’ हा सिनेमा.
या चित्रपटात दमदार Action Scenes, Suspense, Powerful Dialogues आणि उत्कृष्ट Music यांचा भन्नाट संगम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे Action Lovers आणि Thriller Fans मध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘रेविकांता फिल्म्स निर्मित’ आणि ‘Aakat Distribution’ प्रस्तुत या सिनेमात अभिनेते Ajoy Sharma पोलिस इन्स्पेक्टरच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अनंत जोग, विजय पाटकर, शांती बावकर, सुरेखा कुडची, सिद्धेश आचरेकर, संकेत मोरे, ओम राणे, विपुल भोईर यांसारखी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत विसपुते आणि कैलाश पवार यांनी केले असून निर्मितीची धुरा सौ. कांता शर्मा यांनी सांभाळली आहे. संगीतकार समीर खोले, मंदार कीर, रवींद्र खरात आणि विकी वाघ यांच्या संगीताचीही सध्या चर्चा रंगली आहे.
मराठीतही Big Scale Action Thriller तयार होऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘Mission’ हा सिनेमा ठरणार आहे.
आता 15 मे रोजी हा RDX Mystery आणि Bomb Blast Investigation वर आधारित थरार मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

0 Comments