शंभर कोटी Road Project रखडला; AAP चा आयुक्तांना थेट सवाल

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

शहरातील विविध नागरी समस्यांवर आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेत विविध प्रश्न मांडले. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला शंभर कोटींचा Road Project अद्याप अपूर्ण असून गटार चॅनेल टाकणे, सील कोट मारणे यांसारखी महत्त्वाची कामे रखडल्याचा मुद्दा आपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.



आयुक्त डॉ. भारूड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरहिताचे अनेक निर्णय घेतल्याबद्दल आम आदमी पार्टीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

महापालिकेत अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया न झाल्याने शेकडो पदे रिक्त असून नागरिकांना सेवा देण्यात अडचणी येत असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. सेवा नियम अंतिम न झाल्यामुळे भरती रखडली असून नगरविकास विभाग तसेच अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.

टिप्पर चालकांच्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत त्याची चौकशी अद्याप पूर्ण न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. नवीन Tender प्रक्रिया राबवताना चौकशी सुरू असलेल्या कंपन्यांना काम देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली.

भटक्या कुत्र्यांसाठी Dog Shelter उभारणीची चर्चा होत असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेसाठी अधिक डॉक्टरांची नियुक्ती करून मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी करण्यात आली.

शहरातील हवा सुधारण्यासाठी १८ कोटी रुपये खर्च करूनही Air Pollution मध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे सांगत ट्रक माऊंटेड Sweeping Machine खरेदी करण्याची सूचना करण्यात आली.

याशिवाय मालमत्ता कराच्या कक्षेत अधिक मिळकती आणण्यासाठी Revision Survey पूर्ण करावा, E-Bus खरेदीला गती द्यावी, पाणी गळती शोधण्यासाठी Task Force नेमावी व दर महिन्याला त्याचा आढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

ब्युरो ऑफिस, विभागीय कार्यालय, टीपी कार्यालय आणि पवडी विभागात E-Governance System चा वापर अनिवार्य करावा, तसेच वर्कशॉप विभागातील मुदतबाह्य वाहने व विविध आस्थापनांमधील Scrap साहित्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, संजय नलवडे, शिवानी गजबर, दुष्यंत माने, विजय हेगडे, राकेश गायकवाड, मयूर भोसले, इस्थेर कांबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments