“First Government, Then Public”वाढती Inflation, Fuel Crisis वर हिंदू महासभेचा सरकारला थेट सवाल

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

देशातील वाढती Inflation, बेरोजगारी, Fuel Crisis, आर्थिक ताण आणि संसाधनांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर अखिल भारत हिंदू महासभा, जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले. सरकारने जनतेला Fuel Saving आणि काटकसरीचे आवाहन करण्यापूर्वी स्वतः आदर्श निर्माण करावा, अशी ठाम भूमिका महासभेने मांडली.मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गजानन गुरव यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्री, आमदार, खासदार आणि वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या वाढत्या Vehicle Convoy, शासकीय खर्च आणि Luxury Lifestyle वर महासभेने जोरदार टीका केली.


निवेदनात नमूद करण्यात आले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना Fuel Saving, Public Transport चा वापर, Electric Vehicles स्वीकारणे, Work From Home, Swadeshi वस्तूंचा वापर आणि Foreign Tours कमी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र जनतेने त्याग करण्यापूर्वी शासन व्यवस्थेने स्वतःच्या खर्चात कपात करून Example Set करणे आवश्यक असल्याचे महासभेने स्पष्ट केले.

महासभेच्या म्हणण्यानुसार, सामान्य नागरिक महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, बेरोजगारी, शेती संकट आणि आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना लोकप्रतिनिधींना मिळणारे भरमसाठ Salary, Allowances, Free Facilities आणि Lifetime Pension यामुळे जनतेत नाराजी वाढत आहे.महासभेने शासनाकडे मंत्री व लोकप्रतिनिधींच्या वाहन ताफ्यात कपात, Electric Vehicles चा वापर, अनावश्यक Foreign Tours आणि खर्चिक Events वर नियंत्रण, “Energy Saving Code” लागू करणे तसेच आमदार-खासदारांच्या Salary आणि सुविधांमध्ये कपात करण्याची मागणी केली.

“First Government – Then Public” हा आदर्श शासनाने स्वीकारावा, अशी मागणी करत देशहितासाठी जनता त्यागास तयार आहे; मात्र सरकारने स्वतः साधेपणा, Transparency आणि Cost Cutting चे उदाहरण निर्माण करणे गरजेचे असल्याचे महासभेने निवेदनात म्हटले आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. नंदकुमार घोरपडे, जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र तोरसकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. अभिजीत पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. शीलाताई माने, जिल्हा उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, जिल्हा प्रवक्ता श्री. सुनील सामंत, शहराध्यक्ष श्री. अजय सोनवणे, शहर उपाध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, पन्हाळा तालुकाध्यक्ष श्री. बबन खोपकर तसेच अश्विनीताई माळकर उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments