कोल्हापूर | नवप्रवाह मराठी
आधुनिक Healthcare System मध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, रुग्णसेवा ही केवळ Job नसून मानवतेची खरी सेवा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सौ. हसमत हवेरी यांनी केले.डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग येथे मंगळवार, दि. १२ मे रोजी World Nurses Day 2026 उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी भूषविले.
सौ. हसमत हवेरी यांनी आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका Florence Nightingale यांच्या कार्याचा उल्लेख करत Nursing Profession मधील सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले. “परिचारिका या रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील सर्वात महत्त्वाचा Connecting Link आहेत. कोविडसारख्या संकट काळात नर्सेसनी जीवाची पर्वा न करता दिलेली सेवा समाज कधीही विसरू शकणार नाही,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना Modern Technology, Communication Skills आणि Professional Values आत्मसात करून जागतिक स्तरावरील संधींसाठी स्वतःला तयार करण्याचे आवाहन केले. तसेच डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील Healthcare Facilities चे विशेष कौतुकही त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी काळानुसार बदल स्वीकारून आधुनिक ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करण्यावर भर दिला. “नर्सेसशिवाय कोणतेही हॉस्पिटल प्रभावीपणे चालू शकत नाही. उपचार प्रक्रियेतील त्या अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत,” असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. उमारणी जे. यांनी “नर्सेस केवळ रुग्णालयात सेवा देत नाहीत, तर देशनिर्मितीतही त्यांचे मोठे योगदान आहे. आज Nursing Sector हे एक Valuable Investment Career म्हणून पुढे येत आहे,” असे नमूद केले.उपप्राचार्या एम. बिजापूर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी Red Ribbon Campaign अंतर्गत आयोजित रॅली, Role Play आणि Poster Competition मध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. सुनील आवटे, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक तसेच नर्सिंग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)
0 Comments