Chancellor डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘The Captain’s Vision Award’ ने सन्मान

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

Simulation Based Medical Education क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे Chancellor डॉ. संजय डी. पाटील यांना प्रतिष्ठेच्या ‘The Captain’s Vision Award’ ने सन्मानित करण्यात आले. Elevate Healthcare चे International Director रिचर्ड लिवसी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना ‘A Partnership Built On Vision’ हा विशेष पुरस्कारदेखील देण्यात आला.



डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात हा गौरव सोहळा पार पडला. सिम्युलेशन शिक्षण क्षेत्रात विद्यापीठाने निर्माण केलेली जागतिक ओळख आणि आधुनिक वैद्यकीय प्रशिक्षणातील योगदान याबद्दल डॉ. संजय डी. पाटील यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाला Pro-Chancellor तथा विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, Elevate Healthcare चे प्रवीण मित्तल, वृंदन जाधव यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व प्राध्यापक उपस्थित होते.

यावेळी बोलताना रिचर्ड लिवसी यांनी डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “डी. वाय. पाटील विद्यापीठातील Simulation & Skill Centre हे Quality, Vision आणि Innovation चे उत्कृष्ट उदाहरण आहे. डॉ. पाटील यांनी भारतात Simulation Based Education ला नवे आयाम दिले आहेत.”

कोविड काळात सुरू करण्यात आलेल्या या सेंटरमुळे आजपर्यंत ३४ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थींना लाभ झाला असून १ लाख १३ हजार ६६१ तासांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच २ हजार ५८६ Training Programs आणि Workshops यशस्वीपणे पार पडल्या आहेत.

सत्काराला उत्तर देताना डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, “Simulation आधारित शिक्षणामुळे वैद्यकीय विद्यार्थी आणि Doctors अधिक आत्मविश्वासाने उपचार करू शकतात. भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी World Class Facilities उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

ते पुढे म्हणाले की, मेडिकल कॉलेजच्या नव्या २३ मजली इमारतीमध्ये एका पूर्ण मजल्यावर Simulation Centre चा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक समृद्ध अनुभव मिळेल.

Post a Comment

0 Comments