कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना अमेरिकेतील University of Central America कडून Doctor of Letters (D.Litt.) ही मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांसाठी Quality Education उपलब्ध करून दिल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात आयोजित विशेष समारंभात Elevate Healthcare चे International Director रिचर्ड लिवसी यांच्या हस्ते डॉ. पाटील यांचा गौरव करण्यात आला.
डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली डी. वाय. पाटील समूहाच्या ५० हून अधिक Educational Institutions कार्यरत असून सुमारे ४७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. Medical, Engineering, Management, Agriculture, Pharmacy, Nursing आणि Professional Courses च्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे Future घडविण्याचे कार्य सुरू आहे.
यापूर्वीही डॉ. पाटील यांना अनेक National आणि International Awards मिळाले आहेत. २०१३ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हिमाचल प्रदेश विद्यापीठानेही त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती.
यावेळी ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. ए. के. गुप्ता यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राचार्य आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. संजय डी. पाटील यांनी सांगितले की, “हा International Honour माझ्या शैक्षणिक कार्याला नवी ऊर्जा देणारा आहे. विद्यार्थ्यांना Global Opportunities उपलब्ध करून देणे आणि शिक्षणातून समाजात सकारात्मक बदल घडवणे हेच माझे ध्येय राहील

0 Comments