आंबा बागायतदारांच्या आंदोलनाला Sharad Pawar यांचा Support; १५ मे रोजी मुंबईत Dhadak Morcha

मुंबई | नवप्रवाह मराठी

राज्यातील आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात असताना राज्य सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोकणातील फळबाग शेती धोक्यात येण्याची ही सुरुवात असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी १५ मे रोजी मुंबईत होणाऱ्या आंबा बागायतदारांच्या Dhadak Morcha ला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून पूर्ण support जाहीर केला आहे.



आंबा बागायतदारांच्या प्रश्नासंदर्भात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सकाळी मुंबईतील Silver Oak निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आंबा, काजू आणि नारळ उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी पक्ष सक्रिय सहभागी होणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

बैठकीत modern technology, उत्पादकता, नैसर्गिक आपत्ती, आंबा आणि काजू संशोधन केंद्रांचे काम तसेच import-export policy यावरही सखोल चर्चा करण्यात आली. फळबाग लागवड योजनेकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.

कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख आणि ३ लाख रुपयांची मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र राज्य सरकारने हेक्टरी फक्त २२ हजार रुपयांची मदत जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

याच पार्श्वभूमीवर १५ मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी मुंबईत massive morcha काढणार आहेत. दुपारी ३ वाजता गिरगाव चौपाटी येथील टिळक उद्यानातून मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’कडे हा मोर्चा रवाना होणार आहे.

या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, माक्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, धर्मराज्य पक्ष आणि कुणबी सेना यांसह विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

यावेळी मराठी भाषा केंद्राचे प्रमुख दीपक पवार, गणेश गावकर तसेच विविध शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments