राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात डॉ. निरांत पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

 डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे माजी विद्यार्थी आणि सध्या रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये ज्युनिअर फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत असलेले डॉ. निरांत पाटील यांनी राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचा गौरव वाढवला आहे. विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून सेवा देतानाच त्यांनी भारताची आघाडीची कुस्तीपटू मीनाक्षी गोयात यांच्या फिजिओथेरपी व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.


आजच्या घडीला भारतासह जगभरात प्रशिक्षित फिजिओथेरपिस्टची मागणी वाढत आहे. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशात यशस्वीपणे कार्यरत असून आरोग्यसेवा क्षेत्रात फिजिओथेरपी हा उत्तम करिअर पर्याय ठरत आहे. महाविद्यालयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अमृतकुवर रायजादे यांनी दिली.

डॉ. निरांत पाटील हे उत्कृष्ट जलतरणपटू असून स्पोर्ट्स फिजिओथेरपी क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणूनही त्यांची ओळख आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच इंटर युनिव्हर्सिटी जलतरण स्पर्धेत सलग तीन वर्षे सहभाग घेत त्यांनी ऑल इंडिया स्तरावर १८ वे स्थान मिळवले आहे.फिजिओथेरपी पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पुरुष कुस्ती क्रमवारी स्पर्धा, महिला कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा तसेच आशियाई क्रीडा स्पर्धांच्या तिरंदाजी निवड चाचण्यांमध्ये खेळाडूंना दुखापत व्यवस्थापन, सॉफ्ट टिशू उपचार, क्लिनिकल रिझनिंग, मॅन्युअल थेरपी आणि ड्राय निडलिंग यांसारख्या सेवा दिल्या आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा निवड चाचणीत विनेश फोगाटवर विजय मिळवणाऱ्या मीनाक्षी गोयात यांच्या फिजिओथेरपी व्यवस्थापनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

डॉ. निरांत पाटील यांचे यश हे डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि विद्यार्थीकेंद्री वातावरणाचे प्रतीक असल्याचे डॉ. अमृतकुवर रायजादे यांनी सांगितले.महाविद्यालयात बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (BPT) आणि मास्टर ऑफ फिजिओथेरपी (MPT) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. महाविद्यालयाला NAAC A++ मानांकन प्राप्त असून आधुनिक प्रयोगशाळा, संशोधन सुविधा, प्रगत क्लिनिकल प्रशिक्षण, वसतिगृह, ग्रंथालय, क्रीडा सुविधा आणि व्यायामशाळा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

डॉ. निरांत पाटील यांच्या या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले आणि प्राचार्य डॉ. अमृतकुवर रायजादे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments