राजकीय Pressure वापरल्यास Disciplinary Action; बदलीबाबत महापालिकेचे Circular जारी

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या transfer process संदर्भात महत्त्वपूर्ण circular जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम-2005 तसेच संबंधित Government Resolutions (GR) च्या अनुषंगाने महापालिकेकडून नवीन transfer policy तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.



महापालिकेकडे कार्यरत अनेक अधिकारी आणि कर्मचारी बदलीसंदर्भात वारंवार प्रशासनाकडे inquiry करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर बदली ही पूर्णपणे administrative matter असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने विशिष्ट ठिकाणी बदली मिळवण्यासाठी political pressure किंवा दबावतंत्राचा वापर केल्यास ती कृती service rules violation मानली जाईल, असा स्पष्ट इशारा या circular मधून देण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी disciplinary action साठी पात्र ठरेल. त्यामुळे बदली प्रक्रियेत कोणताही बाह्य हस्तक्षेप किंवा शिफारस स्वीकारली जाणार नसल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

या निर्णयामुळे महापालिकेतील transfer system अधिक पारदर्शक आणि नियमबद्ध होण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments