कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
Research.com या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मूल्यांकन संस्थेने जाहीर केलेल्या भारतातील सर्वोत्तम संशोधकांच्या यादीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरच्या दोन संशोधकांनी ‘Top 10’ मध्ये स्थान मिळवत विद्यापीठाच्या संशोधन परंपरेचा जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे.Center for Interdisciplinary Studies चे अधिष्ठाता डॉ. सी. डी. लोखंडे यांनी देशात तिसरा क्रमांक मिळवला असून संशोधन संचालक डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी आठवे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे Materials Science क्षेत्रातील त्यांच्या संशोधन कार्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दखल मिळाली आहे.
Research.com च्या अहवालानुसार संशोधकांची निवड D-Index, Research Citations, Academic Impact आणि Publication Quality या निकषांवर करण्यात आली. डॉ. सी. डी. लोखंडे यांचा D-Index 108 असून त्यांच्या संशोधनाला 41,764 पेक्षा अधिक citations मिळाले आहेत. जागतिक क्रमवारीत त्यांना 725 वे स्थान मिळाले आहे. तर डॉ. प्रमोद एस. पाटील यांचा D-Index 91 असून त्यांच्या संशोधनाला 29,160 हून अधिक citations प्राप्त झाले आहेत. जागतिक स्तरावर त्यांना 1554 वा क्रमांक मिळाला आहे.विद्यापीठाचे संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांनीही या यादीत 185 वे स्थान मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने Energy Storage, Nanotechnology, Supercapacitor, Solar Energy, Battery Technology आणि Advanced Materials Science या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. विद्यापीठाच्या नावावर अनेक National आणि International Patents नोंदवले गेले असून शेकडो संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या Journals मध्ये प्रकाशित झाले आहेत.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी या यशाबद्दल संशोधकांचे अभिनंदन करताना सांगितले की, “Research आणि Innovation ला दिलेले प्राधान्यच आज विद्यापीठाला जागतिक पातळीवर ओळख निर्माण करून देत आहे.”

0 Comments