डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनींना IEEE शिष्यवृत्ती – कोल्हापूरचा अभिमान

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कसबा बावडा येथील दोन विद्यार्थिनींना इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स (IEEE) वुमन्स इन इंजिनियरिंग (WIE) शिष्यवृत्ती मिळाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेल्या 30 विद्यार्थिनींमध्ये द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील ऋतुजा कुंथे आणि सिद्धी कोपार्डे यांचा समावेश आहे.


या शिष्यवृत्तीअंतर्गत लॅपटॉप, मोफत IEEE कोर्सेस तसेच जागतिक स्तरावरील प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून दिल्या जातात. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थिनींना लॅपटॉप प्रदान करण्यात आले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, कुलसचिव डॉ. लितेश मालदे, विभागप्रमुख डॉ. तानाजीराव मोहिते-पाटील आणि प्रा. मनीषा भानुसे यांनी अभिनंदन केले.

IEEE स्टुडंट ब्रांच काउन्सेलर डॉ. मनिषा भानुसे यांनी सांगितले की, हे यश विद्यार्थिनींच्या मेहनतीचे व संस्थेच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. महाविद्यालयाच्या IEEE स्टुडंट ब्रांचच्या स्थापनेच्या पहिल्याच वर्षात मिळालेले हे यश विशेष मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments