कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत मोठे यश संपादन केले आहे. आष्टा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय हॅकॅथॉन स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.या स्पर्धेचे आयोजन अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले होते. देशभरातील ५० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सुमारे ८०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता, त्यामुळे स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली.
डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘Web Based Health Monitoring System’ हा नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सादर केला. मेडिकल क्षेत्रात उपयुक्त ठरणारा हा प्रोजेक्ट परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आणि त्यांना द्वितीय क्रमांक मिळवून दिला.या यशस्वी संघामध्ये संगणक अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षाचे विद्यार्थी ऐश्वर्या देसाई, सारथी पाटील, आर्य सुतार, सुमित मुळे आणि स्वरूप पाल यांचा समावेश आहे. या संघाला २० हजार रुपयांचे रोख पारितोषिकही देण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे तसेच विभागप्रमुख प्रा. डॉ. राधिका ढणाल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

0 Comments