भारतीय वायुदलात इंजिनिअर्ससाठी Golden Career Opportunity | DY Patil Engineering Career Guidance

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

भारतातील तरुणांसाठी एक मोठी आणि अभिमानाची संधी म्हणजे Indian Air Force मध्ये करिअर करण्याची! 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच “Career Opportunities in Indian Air Force” या विषयावर एक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात स्क्वाड्रन लीडर राजन अरोरा आणि फ्लाइट लेफ्टनंट गुरजित सिंग भुल्लर यांनी विद्यार्थ्यांना वायुदलातील विविध Technical आणि Non-Technical career paths विषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी विद्यार्थ्यांना फक्त माहितीच नाही, तर Live experience देण्यात आला. AR आणि VR technology च्या माध्यमातून वायुदलाचे अंतरंग समजावण्यात आले. तसेच flight simulator च्या सहाय्याने प्रत्यक्ष विमान चालवण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला — जो खरोखरच once-in-a-lifetime experience ठरला.या उपक्रमासाठी वायुदलाची विशेष Induction Publicity Exhibition Vehicle (IPEV) ही Volvo van महाविद्यालयात दाखल झाली होती. या van मध्ये fighter jets models, uniforms, advanced gadgets आणि defence technology यांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती.

भारतीय वायुदल वर्षातून दोन वेळा recruitment notifications जाहीर करते. विद्यार्थ्यांना Air Force Academy आणि Air Force Technical College येथे training दिले जाते. Short Service Commission आणि Permanent Commission या दोन्ही माध्यमातून देशसेवेची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.

या कार्यक्रमाला 1100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, आणि हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.

Post a Comment

0 Comments