प्रा. वसिफा कोतवाल यांना पीएचडी; AI-IoT आधारित स्मार्ट वॉटर मॉनिटरिंगवर संशोधन

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा येथील कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक वसिफा समीर कोतवाल यांनी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथून डॉक्टरेट (PhD) पदवी प्राप्त केली आहे.“AI and IoT Based Integrated System for Smart Water Monitoring and Distribution” या विषयावर त्यांनी संशोधन करून आपला शोधप्रबंध सादर केला. हे संशोधन त्यांनी प्रा. डॉ. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केले.

डॉ. वसिफा कोतवाल यांच्या संशोधनामध्ये रिअल-टाइम IoT आधारित सेन्सिंग आणि AI तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याची गुणवत्ता, प्रवाह आणि दाब यांचे त्वरित निरीक्षण करण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तसेच प्रभागनिहाय अचूक पाणी मागणीचा अंदाज घेऊन योग्य नियोजन करणे आणि पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी user-friendly dashboard तयार करण्याचाही या प्रणालीमध्ये समावेश आहे.

या यशाबद्दल त्यांना कुलपती डॉ. संजय डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, डॉ. जयदीप पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके तसेच डॉ. समीर कोतवाल यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले.

Post a Comment

0 Comments