Kolhapuri Chappal उद्योगासाठी संसदेत Bill | MP Dhananjay Mahadik यांचा पुढाकार

नवी दिल्ली : नवप्रवाह मराठी 

 कोल्हापूरची ओळख असलेल्या Kolhapuri Chappal आणि पारंपारिक leather craft जतन व विकासासाठी खासदार Dhananjay Mahadik यांनी संसदेत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी संसदेच्या अधिवेशनात Kolhapuri Leather Craft Preservation and Livelihood Security Bill मांडले असून यामुळे स्थानिक कारागिरांच्या उपजीविकेची सुरक्षा करण्याचा प्रयत्न केला आहे.सध्या नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या Parliament session दरम्यान राज्यसभेत हे bill सादर करण्यात आले. या विधेयकाचा मुख्य उद्देश पारंपारिक चर्म उद्योगाला संरक्षण, स्थिरता आणि प्रोत्साहन देणे हा आहे.

या bill अंतर्गत Kolhapuri Chappal आणि इतर leather products चा national तसेच international level वर प्रचार आणि विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच पारंपारिक कलेचे preservation, promotion आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत कारागिरांच्या रोजगाराची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा हेतू स्पष्ट करण्यात आला आहे.

Kolhapuri Chappal ही केवळ कोल्हापूरची ओळख नसून ती जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. बदलत्या बाजारपेठेत leather products ला वाढती मागणी असताना या उद्योगाला policy level वर support मिळणे अत्यंत आवश्यक मानले जात आहे.

खासदार Dhananjay Mahadik यांनी मांडलेले हे विधेयक पारंपारिक कारागिरांसाठी दिलासा देणारे ठरण्याची शक्यता असून Kolhapuri leather industry साठी हा एक मोठा positive step मानला जात आहे.

Post a Comment

0 Comments