DYPCET Vectors ने SAE India BAJA 2026 मध्ये 10 Awards जिंकले | National Rank 3

कोल्हापूर: नवप्रवाह मराठी 

 येथील D. Y. Patil Autonomous Engineering College च्या Mechanical Engineering विभागातील विद्यार्थ्यांनी SAE India BAJA 2026 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. DYPCET Vectors या टीमने एकूण 10 पुरस्कार पटकावत देशभरातील 51 संघांमध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे.हैद्राबादजवळील नरसापूर येथे झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या ATV (All-Terrain Vehicle) च्या आधारे उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत design, stress analysis, acceleration, braking, suspension, traction यांसारख्या विविध technical निकषांवर मूल्यांकन करण्यात आले.

DYPCET Vectors टीमने Sales Presentation मध्ये प्रथम क्रमांक, Design आणि Overall Static मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच CAE Analysis, Sustainability, Durability, Acceleration, Suspension, Traction आणि Overall Dynamics या विभागांमध्ये तृतीय क्रमांक मिळवत एकूण 10 राष्ट्रीय पुरस्कार मिळवले.या टीमचे नेतृत्व अर्षद सनदी यांनी केले. विद्यार्थ्यांना Mechanical विभागप्रमुख डॉ. एस. जे. रायकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. दिपक सावंत आणि प्रा. महेश शिंदे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नरसापूर येथे झालेल्या या स्पर्धेत DYPCET Vectors टीमने केलेली कामगिरी ही कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

Post a Comment

0 Comments