कागल नगरपरिषदेतील उमेदवारांची माहिती देण्यास टाळाटाळ; RTI अंतर्गत मैनुद्दीन शेख यांचा आरोप

कोल्हापूर : प्रतिनिधी

कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांची Nomination Papers, जातीचे दाखले तसेच इतर संबंधित Documents ची माहिती मिळावी, यासाठी कागल येथील सामाजिक कार्यकर्ते मैनुद्दीन शेख यांनी Right to Information (RTI) अंतर्गत कागल नगरपरिषदेच्या Chief Officer यांच्याकडे अर्ज केला आहे. मात्र ही माहिती देण्यास संबंधित विभागाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मैनुद्दीन शेख म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत Transparency राखण्यासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संपूर्ण माहिती नागरिकांना उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र कागल नगरपरिषद प्रशासनाकडून या माहितीबाबत दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.तसेच नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांच्या Basic Issues सोडवण्याऐवजी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कागल नगरपरिषद क्षेत्रात Fair आणि Transparent Process राहणे गरजेचे आहे. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे ही प्रक्रिया निष्पक्ष राहील का, याबाबत शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, RTI अंतर्गत मागवलेली माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली नाही तर Election Commission कडे तक्रार दाखल करून Court मध्ये धाव घेण्यात येईल, असा इशाराही मैनुद्दीन शेख यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments