नवी दिल्ली : नवप्रवाह मराठी
महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नुकतीच Delhi University ला भेट देत तेथील college election system आणि विद्यार्थी संघटनांच्या कामकाजाची माहिती घेतली. नवी दिल्लीतील महाविद्यालयीन निवडणुका अत्यंत चुरशीच्या वातावरणात होत असून विविध विद्यार्थी संघटना येथे सक्रियपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.दिल्ली विद्यापीठ परिसरात भेटीदरम्यान कृष्णराज महाडिक यांनी स्वामी विवेकानंद स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर विद्यापीठातील विविध student organizations च्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली.
यावेळी विद्यापीठ student union leader आर्यमान यांची विशेष भेट घेऊन महाविद्यालयीन निवडणुकांची election process, students unions चे अधिकार, त्यांची उद्दिष्टे तसेच campus मधील academic आणि social environment याविषयी सविस्तर माहिती घेतली.
या भेटीदरम्यान Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP), Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) आणि Vishva Hindu Parishad (VHP) या संघटनांशी संबंधित विद्यार्थी प्रतिनिधींशी देखील संवाद साधण्यात आला.
देशभरातील युवापिढीच्या अपेक्षा, प्रश्न आणि त्यांचे leadership development समजून घेण्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले.

0 Comments