कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
अनुसूचित जाती (SC) Reservation बचावासाठी कोल्हापुरात आज आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने भव्य Maha Morcha काढण्यात आला. ऐतिहासिक बिंदू चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मोर्चा दसरा चौकात छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.या महासंघर्ष मोर्चामध्ये SC समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिलांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात Bogus SC Caste Certificate काढून आरक्षित जागांवर निवडणुका लढवण्याचे प्रकार वाढल्याचा आरोप आरक्षण बचाव संघर्ष समितीने केला आहे. विशेषतः गडहिंग्लज, इचलकरंजी आणि पट्टणकोडोली परिसरात अशी प्रकरणे उघडकीस आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही प्रमाणपत्रे दिली जात असल्याने मूळ मागासवर्गीयांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, दरगोंडा बसगोंडा पाटील (महेश पाटील) – जि.प. सदस्य पट्टणकोडोली, महेश महादेव तुरबतमठ – नगराध्यक्ष गडहिंग्लज आणि सौ. अलका अशोक स्वामी – नगरसेविका इचलकरंजी यांची अनुसूचित जातीची Caste Certificate तात्काळ रद्द करावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.तसेच आरक्षित जागांवर खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडून आलेल्यांची पदे तात्काळ बरखास्त (Disqualify) करावीत आणि शासनाची दिशाभूल केल्याबद्दल संबंधितांवर कठोर Criminal Case दाखल करावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे (Memorandum) करण्यात आली.
दरम्यान, येत्या 15 दिवसांत प्रशासनाने या प्रकरणात ठोस निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन (Intensified Protest) छेडण्याचा इशारा आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
या मोर्चात आरपीआय (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार सुजित मिंचेकर, डी. जी. भास्कर, सुभाष देसाई, दुर्वास बापू कदम, शिवाजीराव कवाळे यांच्यासह SC समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मोर्चात अंदाजे ३ ते ५ हजार आंदोलनकर्ते सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


0 Comments