कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
कोल्हापूर जिल्ह्यातील फुलेवाडी रिंगरोड परिसरात घडलेल्या महेश राख यांच्या निर्घृण खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धांत गवळी याला अखेर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. जवळपास सहा महिन्यांपासून फरार असलेल्या या Gang Leader ला पकडण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास (Technical Investigation) आणि गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास गंगाई लॉनच्या मागे, शिवराज सावंत यांच्या घरासमोर फुलेवाडी रिंगरोड, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे सिद्धांत गवळी व त्याच्या टोळीने महेश राख यांचा निर्घृण खून केला होता. या गुन्ह्यात यापूर्वीच १५ आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र या टोळीचा म्होरक्या सिद्धांत गवळी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तो सतत आपली ओळख लपवून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. नातेवाईक किंवा मित्रांशी कोणताही संपर्क न ठेवता तो वारंवार आपले राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याचा माग काढणे अवघड झाले होते.दरम्यान, पोलीस अमलदार विजय तळसकर यांना दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली की आरोपी सध्या मुंबईतील चेंबूर परिसरात वास्तव्यास आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे आणि पोलीस अमलदार विजय तळसकर यांनी चेंबूर, मुंबई येथे तळ ठोकून तपास सुरू केला.
तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण कक्ष, बांद्रा (Unit No. 9) चे पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे यांच्या मदतीने तांत्रिक तपास करण्यात आला. अखेर दि. ८ मार्च २०२६ रोजी आरोपीच्या वास्तव्याची खात्री झाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना माहिती देण्यात आली आणि पुढील कारवाईसाठी पोलीस अमलदार रणजीत पाटील व सोमराज पाटील यांना मुंबईला बोलावण्यात आले.आरोपी राहत असलेले ठिकाण झोपडपट्टी व दाट लोकवस्तीचे असल्याने कोणतीही खबर न लागता त्याला पकडणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. त्यामुळे तपास पथकाने वेशांतर करून (Disguise Operation) विशेष कौशल्य वापरत आरोपी राहत असलेल्या रूमची खात्री केली.
यानंतर गुन्हे प्रकटीकरण कक्ष, चेंबूर (Unit No. 6) यांच्या मदतीने नियोजनबद्ध छापा (Planned Raid) टाकत दि. १० मार्च २०२६ रोजी आरोपी सिद्धांत गवळी याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला करवीर पोलीस ठाण्यात आणून संबंधित खून प्रकरणात अटक करण्यात आली.आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. १९ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody Remand) सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, पोलीस अंमलदार विजय तळसकर, रणजीत पाटील, सफौ राहुल देसाई, सोमराज पाटील, योगेश लोकरे, श्रीधर जाधव, अविनाश कांबळे सचीन बेडकळे, यांनी सहभाग घेतला.तर सुरेश राठोड नेम -सायबर पो ठाणे चेंबूर व स्थानिक पुणे शाखा चेंबूर बांद्रा यांचे विशेष सहकार्य लाभले

0 Comments