कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
Dr. Gyanvatsal Swami यांनी सकारात्मकता, विश्वास आणि ‘I Can’ ही भावना यशासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना जीवनात माणसे जोडण्याचा सल्ला दिला. ते D. Y. Patil Deemed University च्या १४ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या समारंभात एकूण ७४१ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.दीक्षांत समारंभाची सुरुवात D. Y. Patil Hospital Kolhapur परिसरातील भव्य शोभायात्रेने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलपती Dr. Sanjay D. Patil यांनी भूषविले.
यावेळी Dr. Vedprakash Mishra (प्र-कुलपती, Datta Meghe Institute of Higher Education and Research), विश्वस्त Ruturaj Patil, Prithviraj Patil, Tejas Patil, कुलगुरू Dr. Rakesh Kumar Sharma, कुलसचिव Dr. Vishwanath Bhosale आणि परीक्षा नियंत्रक Abhay Joshi यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वामीजी पुढे म्हणाले की, माजी राज्यपाल Dr. D. Y. Patil यांच्याकडून मिळालेली सकारात्मकता आणि गुरु Mahant Swami Maharaj यांनी दिलेला ‘I Can’ मंत्र यांची सांगड घातली तर आयुष्यात यश आणि समाधान मिळू शकते. भारत हा तरुणांचा देश असून तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे भविष्य उज्ज्वल आहे.आजच्या मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. तसेच आयुष्यात कुटुंबाला वेळ देणे, नैतिकतेचे पालन करणे आणि समाजासाठी योगदान देणे हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलपती Dr. Sanjay D. Patil म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग देशसेवा आणि समाजाच्या प्रगतीसाठी करावा. व्यवसायिक आयुष्यात प्रामाणिकपणा, सचोटी आणि नैतिकता जपल्यास यश नक्की मिळते.कुलगुरू Dr. Rakesh Kumar Sharma यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडत विविध पुरस्कार आणि संशोधनातील यशाबद्दल माहिती दिली. तसेच पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.समारंभाला विविध विद्यापीठांचे माजी कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्र उभारणीत योगदान :
D. Y. Patil Deemed University मध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण, मूल्ये आणि समाजभान दिले जाते. या माध्यमातून राष्ट्र उभारणीत विद्यापीठ आणि पाटील कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याचे Dr. Gyanvatsal Swami यांनी नमूद केले.



0 Comments