कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
न्यूझीलंडचा पराभव करत भारताने T20 World Cup जिंकत इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष संपूर्ण देशभरात पाहायला मिळत असून कोल्हापुरातही क्रिकेटप्रेमींनी मोठ्या उत्साहात आनंद व्यक्त केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तरुणाई आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसले.भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करत T20 World Cup वर आपले नाव कोरले आणि त्यानंतर कोल्हापूर शहरात आनंदाची लाट उसळली. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शेकडो तरुण आणि क्रिकेटप्रेमी एकत्र जमले होते. हातात भारताचा राष्ट्रध्वज घेऊन “भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
या वेळी पारंपरिक हलगीच्या तालावर तरुणांनी ठेका धरत नृत्य केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर घोषणांमध्ये वातावरण पूर्णपणे देशप्रेमाने भारावून गेले होते. अनेकांनी हातात तिरंगा फडकावत आनंद साजरा केला. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून भारताच्या विजयाचा जल्लोष अधिक रंगतदार करण्यात आला.क्रिकेटप्रेमींच्या उत्साहामुळे संपूर्ण चौक उत्सवमय झाला होता. भारताच्या विजयाचा आनंद इतका मोठा होता की, जणू काही कोल्हापुरात रंगपंचमीचाच रंगोत्सव साजरा होत असल्याचा माहोल तयार झाला होता. नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत भारताच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद द्विगुणित केला.
भारताने न्यूझीलंडला निर्धारित 20 षटकांमध्ये 256 धावांचे आवाहन दिले होते. मात्र न्यूझीलंडचा संघ 19 षटकांत 159 धावांवर गारद झाला. भारताने 96 धावांनी विजय मिळवत विजेतेपद आपल्या नावावर कोरले. स्पर्धेत मालिकावीराचा किताब Sanju Samsung याला मिळाला.
क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असून World Cup जिंकण्याचा हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ठरला आहे. कोल्हापूरमधील तरुणाईनेही हा आनंद मनमुराद साजरा करत देशभक्तीचा उत्साह दाखवून दिला.भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून क्रिकेटप्रेमींनी हा दिवस कायम स्मरणात राहील अशा पद्धतीने साजरा केला. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाहायला मिळालेला जल्लोष हेच दाखवून देतो की, भारताचा World Cup विजय हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.

0 Comments