कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
कोल्हापूर जिल्ह्यात लाचखोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Anti Corruption Bureau (ACB) ने केलेल्या सापळा कारवाईत ग्राम महसूल अधिकारी आणि उपसरपंच यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना red-handed पकडण्यात आले आहे.ही कारवाई करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे गुरुवारी, ५ मार्च रोजी करण्यात आली.या प्रकरणात इरफान दिलावर सनदी (वय ४१) – ग्राम महसूल अधिकारी, सज्जा शिंगणापूर आणि दीपक सदाशिव कांबळे (वय ४३) – उपसरपंच, शिंगणापूर ग्रामपंचायत यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एसीबीच्या DYSP वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी इरफान सनदी यांनी सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितली होती.याबाबत तक्रारदाराने ४ मार्च २०२६ रोजी Anti Corruption Bureau, Kolhapur येथे तक्रार दाखल केली.ACB ने तक्रारीची verification केली असता, इरफान सनदी यांनी स्वतःसाठी तसेच उपसरपंच दीपक कांबळे यांच्या माध्यमातून लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. नंतर तडजोडीनंतर ही रक्कम ५ हजार रुपये इतकी ठरवण्यात आली.त्यानंतर ACB ने trap operation राबवला.५ मार्च रोजी शिंगणापूर तलाठी कार्यालय परिसरात तक्रारदाराकडून दीपक कांबळे यांनी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि त्यानंतर ACB पथकाने त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडले.तपासात आरोपींनी ही रक्कम तलाठी कार्यालयाजवळील खोलीतील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगितल्याचे उघड झाले असून ती रक्कम तेथून जप्त करण्यात आली.
या कारवाईदरम्यान :
५ हजार रुपयांची लाच रक्कम
Samsung A23 मोबाईल फोन
Oppo F31 मोबाईल फोन
असे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.या प्रकरणी Karveer Police Station येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा Prevention of Corruption Act कलम ७ आणि ७(A) अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई ACB Kolhapur चे पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात HC संदीप काशिद, PN सचिन पाटील, PC संदीप पवार, PC कृष्णा पाटील आणि चालक पोलीस हवालदार गजानन कुराडे यांचा समावेश होता.

0 Comments