कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
शहरातील सर्वाधिक commercial area म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजारामपुरी परिसरातील ड्रेनेज समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर Shiv Sena (Uddhav Thackeray) पक्षाच्या गटनेत्या व नगरसेविका प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी महापालिकेकडे महत्त्वाची मागणी केली आहे. राजारामपुरी, व्यापार पेठ, शाहूपुरी, माळी कॉलनी आणि टाकळा परिसरातील drainage line development साठी महापालिकेच्या 2026-2027 Budget मध्ये विशेष आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन सादर केले.
दरवर्षी राजारामपुरी परिसरातून महापालिकेला सुमारे 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त tax revenue मिळतो. तरीही येथील नागरिकांना योग्य drainage सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी drainage water रस्त्यावर वाहताना दिसत आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
राज्य शासनाच्या निधीतून सध्या शहरातील सम्राटनगर, प्रतिभानगर, विद्यापीठ परिसरात मोठ्या drainage pipeline projects सुरू आहेत. या मोठ्या लाईन्स जर राजारामपुरीतील जुन्या 9 inch किंवा 4 inch drainage line ला जोडल्या गेल्या तर संपूर्ण भागाचा load राजारामपुरीवर येऊन drainage समस्या आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा प्रतिज्ञा उत्तुरे यांनी दिला.त्यामुळे राजारामपुरी परिसरात किमान 24 ते 30 inch diameter ची नवीन drainage pipeline टाकण्यासाठी महापालिकेने special package जाहीर करावे आणि 2026-27 च्या municipal budget मध्ये त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

0 Comments