कोल्हापूर | नवप्रवाह मराठी
राज्य सरकारने मांडलेला यंदाचा Budget हा “बडा घर पोकळ वासा” असल्याची टीका विधानपरिषद काँग्रेस गटनेते आमदार Satej Patil यांनी केली आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता ते सोयीस्करपणे बदलण्यात आले असल्याचे सतेज पाटील म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जफेड केली आहे.या प्रामाणिक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी २ लाख रुपयांपर्यंत Incentive Subsidy (प्रोत्साहन अनुदान) द्यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.तसेच कोणतेही जाचक नियम किंवा अटी न लावता सर्व शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा, अशीही आग्रही भूमिका त्यांनी मांडली.दरम्यान, राज्यात युवकांमधील बेरोजगारी वाढत असताना Budget मध्ये ठोस उपाययोजना दिसत नाहीत. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याची टीकाही त्यांनी केली.
राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे “Contractor Pass आणि शेतकरी, मध्यमवर्गीय व युवक Fail” असा असल्याची तीव्र प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

0 Comments