कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
कोल्हापूरमधील D. Y. Patil Deemed to be University Kolhapur ने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळवले आहे. हिमाचल प्रदेशमधील Shoolini University येथे झालेल्या ‘Anveshan’ International Research Competition मध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावत दुहेरी यश संपादन केले.२४ आणि २५ फेब्रुवारी रोजी आयोजित या स्पर्धेत देशभरातील निवडक १२ संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी आपले संशोधन सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मेडिकल बायोटेक्नोलॉजी विभागातील पीएचडी संशोधक सुस्मिता सतीश पाटील आणि मयुरी महादेव घाटगे यांनी विकसित केलेल्या Dengue Detector Project ला प्रथम क्रमांक मिळाला. या प्रकल्पामध्ये कागदाधारित Nanocomposite Electrochemical Biosensor तयार करण्यात आला आहे.हा सेन्सर कमी खर्चात आणि अत्यंत जलद गतीने NS1 Antigen ओळखू शकतो. त्यामुळे डेंग्यूचे लवकर निदान होऊन गंभीर गुंतागुंत टाळण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी संशोधकांना ७५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या प्रकल्पाला प्रा. डॉ. अर्पिता पांडे-तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच Stem Cell and Regenerative Medicine विभागातील पीएचडी संशोधक हर्षदा लोखंडे आणि प्रिया वाडकर यांनी सादर केलेल्या 3D Bioprinting of Small Diameter Vascular Grafts या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला. या संशोधनासाठी त्यांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.या तंत्रज्ञानामुळे भविष्यात कृत्रिम रक्तवाहिन्या अधिक जैवसुसंगत आणि कार्यक्षम पद्धतीने तयार करणे शक्य होणार आहे. या संशोधनाला डॉ. मेघनाद जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
यापूर्वी गुजरातमधील Sardar Patel University Vallabh Vidyanagar येथे झालेल्या Anveshan West Zone Competition मध्येही या दोन्ही प्रकल्पांनी अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवला होता.
या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, तसेच अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे आणि रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील यांनी संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

0 Comments