गोकुळची Nari Samman Insurance Scheme सुरू; महिला दूध उत्पादकांना 2 लाखांपर्यंत Insurance Cover

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) कडून महिला दूध उत्पादकांसाठी ‘Nari Samman Insurance Scheme’ सुरू करण्यात आली आहे. International Women’s Day चे औचित्य साधत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. गोकुळ दूध संघ आणि New India Assurance Company यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत आहे.

गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते शिरगाव येथे आयोजित कार्यक्रमात या योजनेच्या information brochure चे अनावरण करण्यात आले. यावेळी गोकुळचे संचालक मंडळ, अधिकारी, मान्यवर तसेच महिला दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

2026 हे वर्ष ‘International Year of Women Farmers’ म्हणून जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील महिला दूध उत्पादकांना social आणि financial security मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत प्रत्येक महिला दूध उत्पादकाला 2 लाख रुपयांपर्यंत Insurance Cover दिले जाणार आहे. प्रारंभी गोकुळशी संलग्न असलेल्या सुमारे 1 लाख women milk producers ना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या योजनेसाठी annual premium 150 रुपये इतका निश्चित करण्यात आला असून त्यापैकी 30% म्हणजे 45 रुपये गोकुळ दूध संघाकडून subsidy स्वरूपात भरले जाणार आहेत. उर्वरित 105 रुपये beneficiary महिलांकडून घेण्यात येणार आहेत.ही योजना गोकुळशी संलग्न प्राथमिक दूध संस्थांमधील 18 ते 70 वयोगटातील women dairy farmers साठी लागू राहणार आहे. विम्याचा policy period एक वर्षाचा असेल.या योजनेअंतर्गत accidental death, permanent किंवा partial disability, beneficiary च्या पती किंवा आई-वडिलांचा accidental death, acid attack तसेच natural disaster मुळे होणाऱ्या नुकसानीसाठी नियमानुसार insurance compensation दिली जाणार आहे.

दुग्ध व्यवसायात महिलांचा मोठा सहभाग असून ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. अचानक संकट आल्यास महिलांना financial support मिळावा आणि त्यांच्या कुटुंबाला economic protection मिळावे यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केला. तसेच जास्तीत जास्त महिला दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments